Advertisement

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरेंची भेट, 'राज'नीती वर दीड तास खलबंत

मनेसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. यासोबतच अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशीही चर्चा सध्या रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरेंची भेट, 'राज'नीती वर दीड तास खलबंत
SHARES

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

मुंबईत आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे नवीन समीकरणांची तर सुरुवात नाही ना? अशी पण चर्चा सुरू आहे.

मनेसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. यासोबतच अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशीही चर्चा सध्या रंगली आहे.

राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, "ही धादांत खोटी माहिती आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरणनिर्मिती करत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला यासंदर्भात माहिती दिल्याचे समजते."

मंत्रिपदाविषयी आमदार राजू पाटील यांनी काल प्रतिक्रिया दिली. आम्ही कोणत्याही अपेक्षेने भाजपाला पाठिंबा दिलेला नाही. मात्र सभागृहात संधी मिळाली तर त्याचं स्वागतच करू, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदेगट आणि भाजप या दोघांच्या समन्वयातून महाराष्ट्रात नुकतंच सत्तांतर झालं. यावेळी राज ठाकरे यांनी नव्या सरकारला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी पत्राद्वारे नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत आम्ही एकदा थेट भेटायला जाणार आहोत, असं म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्याचा उद्देश होता, असं सांगण्यात येत आहे.हेही वाचा

भाजपकडून अमित ठाकरेंना मंत्रीपद? राज ठाकरे म्हणाले...

आदित्य ठाकरेंविरोधात FIR दाखल करा, राष्ट्रीय बाल आयोगाचे पोलिसांना निर्देश

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा