Advertisement

महाराष्ट्र सरकार लवकरच म्हाडाच्या व्याजदरांबाबत आढावा घेणार : देवेंद्र फडणवीस

म्हाडाचे व्याजदर कमी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकार लवकरच म्हाडाच्या व्याजदरांबाबत आढावा घेणार : देवेंद्र फडणवीस
SHARES

म्हाडाकडून गृहप्रकल्पासाठी विकासकांवर अधिमूल्य आकारले जाते. अधिमूल्याची रक्कम भरण्यास विलंब झाल्यास विकासकांवर १८ टक्के व्याज आकारले जाते. हे व्याजदर अधिक असून हे दर कमी करण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तर हे दर कमी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिलतर्फे (नरेडको) वांदे – कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘होमेथॉन २०२३’ नावाने भरवण्यात आलेल्या या मालमत्ता प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. 

म्हाडाकडून विकासकांवर आकारण्यात येणारे व्याज अधिक असून ते कमी करण्याची मागणी ‘नरेडको’ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप रूनवाल यांनी केली.

म्हाडा आकारत असलेले व्याजदर अधिक असून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन फडणवीस यांनी या वेळी दिले. या बाबतचा आढावा घेऊन म्हाडाला व्याजदर कमी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.



हेही वाचा

मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही तर... : छगन भुजबळ

मोठ्या पडद्यावर झळकणार शिवसेना पक्षफुटी, शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा