Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोड यांचा राजीनामा?

शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजीनाम्यासाठी भाजपकडून वाढलेल्या दबावामुळे राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचं म्हटलं जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोड यांचा राजीनामा?
SHARES

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात सातत्याने नाव येत असलेले शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजीनाम्यासाठी भाजपकडून वाढलेल्या दबावामुळे राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचं म्हटलं जात आहे.

स्पोकन इंग्लिश क्लाससाठी भावासोबत पुण्यात राहत असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर  भाजपकडून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. त्यातच ८ दिवसांपासून संजय राठोड गायब असल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेते अधिकच आक्रमक झाले आहेत. परिणामी ठाकरे सरकारवरील दबाव देखील वाढत चालला आहे. 

विरोधकांच्या आक्रमकतेला थोपवून धरण्यासाठी ठाकरे सरकारने संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घेतल्याची चर्चा रंगली आहे. मात्र राज्य सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा- पूजा चव्हाण प्रकरणी नियमानुसारच चौकशी- अनिल देशमुख

दरम्यान, तरुणीच्या कुटुंबावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सुओ मोटो अंतर्गत गुन्हा दाखल करायला पाहिजे. सगळे ऑडिओ क्लिप्स, फोटोंबद्दल गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे, अशी मागणी करत भाजपच्या (bjp) उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट राठोड यांचं नाव घेतलं होतं.

गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीही महत्वाची आहे. भाषणांमध्ये महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलणं फार सोपं असतं; पण आता राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की, एवढे पुरावे असताना कसली वाट पाहत आहात. मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पाहताय? असा प्रश्न देखील त्यांनी सरकारला विचारला.

तर दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी कुणाचंही नाव न घेता या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारं पत्र पोलीस महासंचालकांना दिलं आहे. 

(maharashtra forest minister sanjay rathod might resign from post after pooja chavan suicide case allegation)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा