Advertisement

ठाणे, मिरा-भाईंदरमधील आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी

ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राना मंजुरी देतानाच या कामासाठी त्वरीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम चालू करण्याचे आदेश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

ठाणे, मिरा-भाईंदरमधील आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजुरी
SHARES

ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राना मंजुरी देतानाच या कामासाठी त्वरीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम चालू करण्याचे आदेश राज्याचे सामाजिक न्याय व  विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. 

ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये या केंद्राची निर्मिती व्हावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. या वास्तूमध्ये विपश्यना केंद्र, लायब्ररी व राहण्याची व्यवस्था होणार असल्याने परगावाहून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना त्याचा फायदा होणार आहे. या दोन्हीं प्रस्तावाना मंजुरी देत असताना गरज पडल्यास या केंद्रांसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

ठाणे महानगरपालिका (thane) हद्दीतील आनंद नगर येथील महानगरपालिकेच्या सुविधा भुखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार असून या कामी ९ कोटी ७५ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ९० %  राज्य शासनाचा निधी उपलब्ध होणार असून १० % निधी हा ठाणे महानगरपालिकेने द्यावयाचा आहे. ही वास्तू पूर्ण झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात राहणार असून त्याची निगा व देखभाल ठाणे महानगरपालिका करणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूरी ही दिलेली आहे. 

हेही वाचा- प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी ‘ही’ अट शिथिल

मिरा-भाईंदर महानगरपालिका (mira bhaynder ) क्षेत्रातील महसूल खात्याची जमीन सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात दिलेली असून त्याठिकाणी १३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ९० % राज्य शासन व १० % खर्च हा मिरा-भाईंदर महानगरपालिका करणार असून त्यांचीही निगा व देखभाल वास्तू पूर्ण झाल्यानंतर मिरा-भाइर्दर महानगरपालिकेकडे सोपविण्याचा निर्णय झालेला आहे. तसंच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही मंजूरी दिलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकल्प प्रलंबित होते. या प्रलंबित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरीत मंजुरी दिल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव  श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, दिनेश डिंगळे, मिरा-भाईंदर आयुक्त डॉ. विजय राठोड, सिटी इंजिनियर रविंद्र खडताळे, प्रादेशिक उपायुक्त कोकण वंदना कोचुरे आदी उपस्थित होते.

(maharashtra government approved dr babasaheb ambedkar cultural center in thane and mira bhayander)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा