Advertisement

मुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर
SHARES

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत ३ सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला आहे.

तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. पण २ सदस्यीय प्रभाग पद्धत नगरपालिका आणि नगरपरिषदेत असेल. नगरपंचायतीलाही १ सदस्यीय पद्धत असेल.

आज झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुंबई महानगर पालिका वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तीनचा प्रभाग करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या दबावापुढे अजित पवारांना माघार घ्यावी लागली.

हा निर्णय जनतेच्या फायद्यासाठी घेतल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. “सदस्यसंख्या जास्त असेल, तर जनतेसाठी विकासकामं करणं अधिक सुलभ होतं आणि कामं देखील वेगानं होतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

मिनी विधानसभा म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या २०१७ च्या मनपा निवडणुकीत पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपुरात भाजपची एकहाती सत्ता आली होती. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच विद्यमान सरकारने कायद्यात बदल करून पुन्हा एक सदस्यीय वार्ड पद्धती आणली. खुद्द अजित पवार यांनीच पुढाकार घेऊन प्रभाग पद्धती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

पुढील वर्षी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.हेही वाचा

किरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ - अतुल भातखळकर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा