Advertisement

परप्रांतीय मजुरांची यादी तर दिली, फक्त गोरखपूरला निघालेली ट्रेन ओडिशाला पोहचू नये- संजय राऊत

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील गोरखपूरला निघालेली ट्रेन चुकून ओडिशामध्ये पोहोचली होती. हाच धागा पकडून संजय राऊत यांनी पियूष गोयल यांना लक्ष्य केलं.

परप्रांतीय मजुरांची यादी तर दिली, फक्त गोरखपूरला निघालेली ट्रेन ओडिशाला पोहचू नये- संजय राऊत
SHARES

परप्रांतीय मजुरांना (migrant worker) त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी आवश्यक विशेष ट्रेनच्या संख्येवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात जुंपलेली असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी देखील या वादात उडी घेतली. आम्ही परप्रांतीय मजुरांची सर्व यादी दिली आहे, फक्त एकच विनंती आहे की, गोरखपूरसाठी निघालेली ट्रेन ओडिशाला पोहचू नये, असं म्हणत राऊत यांनी गोयल यांना टोमणा मारला आहे.

हेही वाचा - उद्धवजी फक्त यादी द्या, उद्यापासून १२५ ट्रेन सोडतो- पियुष गोयल

महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना सोडण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने विशेष ट्रेनची (special shramik train) मागणी करण्यात येत होती. परंतु परिस्थिती बिघडल्यावर अखेर केंद्र सरकारने ट्रेन चालवण्याची परवानगी दिली. त्यातच महाराष्ट्रात किमान दररोज ८० ट्रेन चालवण्यात याव्यात, अशी विनंती करूनही प्रत्यक्षात केवळ निम्म्याच म्हणजे ४० ट्रेन रेल्वेकडून चालवण्यात येत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांनी जनतेशी संवाद साधताना रेल्वे मंत्रालयावर केला होता. 

उद्धव ठाकरेचं वक्तव्य खटकल्याने रेल्वेमंत्री पियुष गोयल (railway minister piyush goel) यांनी तासाभराच्या आत परप्रांतीय मजुरांची यादी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना द्या तुम्हाला उद्यासाठी ताबडतोब १२५ ट्रेन उपलब्ध करून देतो, असं आव्हान मुख्यमंत्र्यांना दिलं. तसंच तासाभरात यादी न मिळाल्याने महाराष्ट्राकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप गोयल यांनी केला. 

त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी गोयल यांना टोमणा मारला. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी,  फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये. 

तसंच १४ मे रोजी नागपुरवरून उधमपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या ट्रेनसाठी कोणती यादी घेतली होती. आधी ट्रेन आणि नंतर माणसं जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले हे कृपया जाहीर करा. मग आता यादी कसली मागताय. तुम्ही राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करता हे विसरू नका, असं म्हणत सुनावलं देखील आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील गोरखपूरला निघालेली ट्रेन चुकून ओडिशामध्ये पोहोचली होती. हाच धागा पकडून संजय राऊत यांनी पियूष गोयल यांना लक्ष्य केलं.

हेही वाचा - परप्रांतीय परत जाताहेत, येत्या १५ दिवसांत देशाचं खरं चित्र समोर येईल- उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा