Advertisement

Bakra Eid: बकरी ईदसाठी सरकारने काढल्या मार्गदर्शक सूचना

कोरोना संकटामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करावी, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

Bakra Eid: बकरी ईदसाठी सरकारने काढल्या मार्गदर्शक सूचना
SHARES

कोरोना संकटामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करावी. ऑनलाईन अथवा दूरध्वनीवरुन जनावरांची खरेदी, प्रतिकात्मक कुर्बानी, सार्वजनिक ठिकाणी  गर्दी टाळणे अशा मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. (maharashtra government issues guidelines for bakra eid)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक  बैठक झाली होती.  त्या बैठकीत कोरोना पार्श्वभूमीवर या वर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असं सर्वानुमते ठरलं.त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचं पालन सर्व संबंधितांनी करावं, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.

हेही वाचा - Bakra Eid: गणेशोत्सवाला दिली तशी बकरी ईदलाही परवानगी द्या, ‘या’ नेत्याची

मार्गदर्शक सूचना

  • कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
  • सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
  • नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
  • प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
  • बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी  गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
  • कोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
  • तसंच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावं.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा