Advertisement

Ganesh Festival 2020: कोकणी माणसाचा अंत पाहू नका!, आशिष शेलारांचा सरकारला इशारा

चाकरमान्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करणार होते. एसटीच्या गाड्या सोडणार होते. परंतु अद्याप सरकारकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारने कोकणी माणसाचा अंत पाहू नये, असं आशिष शेलार म्हणाले.

Ganesh Festival 2020: कोकणी माणसाचा अंत पाहू नका!, आशिष शेलारांचा सरकारला इशारा
SHARES

चाकरमान्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करणार होते. एसटीच्या गाड्या सोडणार होते. परंतु अद्याप सरकारकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारने कोकणी माणसाचा अंत पाहू नये, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रश्नावरून सरकारला इशारा दिला आहे. (maharashtra government must announce e pass for konkan visitors during ganesh festival demands bjp mla ashish shelar)

आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे २५० रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा. त्यांना सुरक्षित सन्मानाने कोकणात जाण्यासाठी परवानगी द्या. तातडीने निर्णयाची घोषणा करा. सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.

शिवाय "ई- भूमिजन" करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप "ई पास" देऊ शकले नाहीत. त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा! चाकरमान्यांबाबत मुख्यमंत्री घोषणा करणार होते. एसटीच्या गाड्या सोडणार होते. कधी? कोकणी माणसाचा अंत पाहू नका, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

हेही वाचा - Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी सोडण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे यासह राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावी जातात. कोरोना संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून एसटीची सेवा पुरवण्यात येईल, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले होते. 

परंतु अद्याप सरकारकडून या एसटी बस केव्हापासून सोडणार याची माहिती देण्यात आलेली नाही. खासगी वाहनांसाठी ई-पास केव्हा उपलब्ध होणार हे देखील कळवण्यात आलेलं नाही. कोकणात जाण्यास इच्छुक चाकरमान्यांना अँटीजन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या चाचणीसाठी २५० रुपये दर सरकारकडून ठरवण्यात आला आहे. परंतु ही चाचणी मोफत करण्यात यावी, अशी शेलार यांची मागणी आहे. 

सोबतच वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून नियमित सुटणाऱ्या अलिबाग, रोहा व रेवदंडा एसटीच्या सेवा गणपती व नवरत्रीउत्सवासाठी पुन्हा सुरु करा अशी विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्राद्वारे केली!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement