Advertisement

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक- उद्धव ठाकरे

धनगर समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं भेट घेतली.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक- उद्धव ठाकरे
SHARES

धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला दिला. धनगर समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीस मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार अनिल देसाई यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते. (maharashtra government positive on dhangar reservation says cm uddhav thackeray)

हेही वाचा- तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ, 'या' ओबीसी नेत्याचा आरक्षणासाठी सरकारला इशारा 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे या विषयाची कोंडी फोडण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न केले जातील. आरक्षणाच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी विचारविनिमय करून सल्ला घेतला जाईल. तसेच या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व्हावा यासाठी समन्वयही साधला जाईल. समाजाच्या विकासासाठीच्या योजनांच्या आर्थिक तरतुदीबाबत निश्चितच सकारात्मक असे प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी सांगितलं.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत विविधस्तरांवर पाठपुरावा केला जाईल, असं सांगितलं.

बैठकीत शिष्टमंडळातील माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णा डांगे, रमेश शेंडगे, खासदार विकास महात्मे, रामराव वडकुते, माजी आमदार अनिल गोटे, गणेश हाके, सुभाष खेमनार, उज्ज्वलाताई हाके आदींनी आरक्षण आणि विविध मागण्यांच्या अनुषंगाने मांडणी केली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा