Advertisement

राज्यात पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार- अनिल देशमुख

राज्य पोलीस दलासाठी १ लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

राज्यात पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार- अनिल देशमुख
SHARES

महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी-कर्मचारी संख्येच्या तुलनेत त्यांना राहण्यासाठी अत्यंत कमी सरकारी घरे उपलब्ध आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून घरांची वाढती मागणी पाहता राज्य पोलीस दलासाठी १ लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. नागपुरातील पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसंच इंदोरा येथील पोलीस अंमलदारांच्या निवासस्थानाचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात स्वातंत्र्यापूर्वी ४८ टक्के घरे होती. मात्र नंतरच्या काळात केवळ ४२ टक्के घरे बांधण्यात आली. घरांची ही कमतरता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेने तीन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

कोरोनामुळे राज्य शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे पोलीस विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वरळी पोलीस सोसायटीच्या जागेत बांधण्यात येणार आहे. प्रकल्प बांधताना पूर्णत: बाहेरुन निधी उभारण्यात येणार असून कंत्राटदाराला ४ एफएसआय देण्यात येणार आहे.

हेही वाचा- शेतकरी मोर्चावर ड्रोनची नजर; पोलिसांचाही चोख बंदोबस्त

नागपुरातील पोलीस मुख्यालय, आणि आयुक्त कार्यालय इमारतींचंही बांधकाम पूर्ण करत इथं घोडदळ सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्याशिवाय बॉडी वॉर्म कॅमेऱ्यांनंतर सेल्फ बॅलन्सींग स्कूटरही पोलिसांच्या मदतीला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य पोलीस दल सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं सांगून गृहमंत्री देशमुख यांनी ९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पात सायबर सिक्युरीटी, सेंटर फॉर एक्सलन्स प्रकल्पाचा यात समावेश असल्याचं सांगितलं.

मुंबईत लवकरच ११२ ही आपत्कालीन सेवा सुरु करणार असून, त्याची दुसरी कंट्रोल रुम नागपुरात करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. त्यासाठी लागणाऱ्या दुचाकी-चारचाकी गाड्यांची खरेदीही करणार असल्याचं अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सांगितलं.  

तर, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पोलीस गृहनिर्माण संस्थेच्या कार्याची माहिती देत हिंगणा, हुडकेश्वर, इमामवाडा, नवीन कामठी येथील पोलीस ठाणे आणि निवासस्थानांच्या बांधकाम सुरु असल्याचं सांगितलं. राज्यात २ लाख २० हजार पोलीस कार्यरत असून, त्या तुलनेत अत्यंत कमी घरे असल्याचे त्यांनी सांगितलं. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख हे ७० हजारावर पोलिसांना निवासस्थाने देण्याचा प्रयत्न करतील, असा आशावाद हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला. 

(maharashtra government will build 1 lakh homes for police department says home minister anil deshmukh)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा