Advertisement

सी लिंक जवळ साकारणार भव्य ‘मुंबई आय’

‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक जवळ ‘मुंबई आय’ साकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सी लिंक जवळ साकारणार भव्य ‘मुंबई आय’
SHARES

‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक जवळ ‘मुंबई आय’ साकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

लंडनमधील थेम्स नदीच्या काठावर ‘लंडन आय’ नावाचा अवाढव्य पाळणा उभारण्यात आला आहे. एकूण १३५ मीटर उंचीचा हा पाळणा १९९९ रोजी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. या पाळण्यातून पर्यटकांना संपूर्ण लंडनच्या विहंगम दृष्याची मजा घेता येते. वर्षाला ३५ लाख पर्यटक ‘लंडन आय’ ला भेट देतात. 

हेही वाचा- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची १०० फुटांनी वाढणार

याचप्रमाणे वांद्रे-वरळी सी लिंकच्या सुरूवातीलाच टोल नाक्याजवळील जागेत ‘मुंबई आय’ साकारण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी सरकारला आधी सीआरझेड आणि इतर परवानग्या घ्याव्या लागतील. याआधी ४ वर्षांपूर्वी वांद्रे बँड स्टँडजवळ १४ हजार चौ.मीटर जागेवर ‘मुंबई आय’ साकारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने तयार केला होता. या प्रस्तावानुसार ‘मुंबई आय’ची उंची ६३० मीटर इतकी असणार होती. ही उंची जगात सर्वाधिक हाेती. परंतु निधीअभावी हा प्रस्ताव रेंगाळला.   

‘मुंबई आय’ साकारण्यात आल्यास एकाच नजरेत मुंबईचं सौंदय पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होऊ शकेल, पर्यटकांचा मुंबईकडे ओढा वाढेल. त्यामाध्यमातून चांगला महसूलही मिळू शकेल, असं मत पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा- शिवरायांचे वंशज असाल, तर पुरावे आणा, उदयनराजेंना राऊतांचं प्रत्युत्तर

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा