Advertisement

कोरोना अजून संपलेला नाही; सावधगिरी बाळगा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोरोना विषाणूचा संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आलं आहे. मात्र कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने कोरोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं.

कोरोना अजून संपलेला नाही; सावधगिरी बाळगा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
SHARES

कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आलं आहे. मात्र कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने कोरोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने राजभवन इथं विविध क्षेत्रातील ३५ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुढं म्हणाले, महाराष्ट्र (maharashtra), केरळ यांसह काही राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्ह वाढत आहेत. कोरोनासंदर्भात बेफिकीरीने न राहता सावधगिरी बाळगून परंतू निर्भयतेने काम करण्याची गरज आहे. 

जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची तसंच बळींची संख्या कमी होती. देशातील समाज सेवक, शासकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छताकर्मी यांनी कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केलं व त्यांना देशातील दानशूर व्यक्तींनी चांगले सहकार्य केलं. त्यामुळेच भारत कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करू शकला, असंही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितलं.

हेही वाचा- नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जा, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुनिता सुमन सिंह व प्रताप सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्र कुमार सिंह व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते सायन इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. मोहन अच्युत जोशी, केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शुश्रुषा हॉस्पिटलचे डॉ. हर्षद शाह, डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. विभा अग्रवाल, समाज सेवक इक्बाल इस्माईल ममदानी, रुग्णवाहिका चालक अनिल आदिवासी, उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, वडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे यांसह इतर कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाही. ही अतिशय चिंतेची बाब आहे. प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी. तर सर्वसामान्यांनीही मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी नागरिकांना दिला.

(maharashtra governor bhagat singh koshyari advice to people stay alert on coronavirus infection)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा