Advertisement

शपथविधीच्या आयोजनावर राज्यपाल कोश्यारी नाराज, नेमकं काय खटकलं?

शपथविधी प्रोटोकाॅलनुसार झाला नसल्याचं त्यांचं म्हणणं असून यापुढील शपथविधीत असा प्रकार घडू नये, अशी सूचना त्यांनी केली आहे.

शपथविधीच्या आयोजनावर राज्यपाल कोश्यारी नाराज, नेमकं काय खटकलं?
SHARES

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गुरूवारी भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी २ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याने तमाम जनतेचं लक्ष वेधून घेतलं असलं, तरी शपथविधी सोहळ्याच्या आयोजनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- कुणी घर देता का घर, फडणवीस नव्या घराच्या शोधात…

ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने शिवाजी पार्कवरील या शपथविधी सोहळ्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. प्रसिद्ध सेट डिझायनर नितीन देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या थिमवर आकर्षक स्टेज उभारला होता. या स्टेजवर राज्यपाल यांच्या आसनव्यवस्थेसोबतच शपथ घेणारे नेते आणि ३०० मान्यवरांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. 

परंतु या व्यवस्थेत शासकीय अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात न आल्याने राज्यपाल या व्यवस्थेवर नाखूश दिसले. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर नेत्यांनी मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेताना आपापल्या पक्षप्रमुखांची आणि समाजसुधारकांची नावं घेतल्यानेही राज्यपाल खास नाराज झाले. हा शपथविधी प्रोटोकाॅलनुसार झाला नसल्याचं त्यांचं म्हणणं असून यापुढील शपथविधीत असा प्रकार घडू नये, अशी सूचना त्यांनी केली आहे.  



हेही वाचा-

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत बहुमत सिद्ध करण्यावर खलबतं, फडणवीसांचा आरोप

फडणवीस सरकारने ५ लाख कोटींचं कर्ज लादलं, वाचा सद्यस्थिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा