Advertisement

कुणी घर देता का घर, फडणवीस नव्या घराच्या शोधात…

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच माजी मुख्यमंत्री ​देवेंद्र फडणवीस ​​​यांनी नवं घर शोधण्यास सुरूवात केल्याचं म्हटलं जात आहे.

कुणी घर देता का घर, फडणवीस नव्या घराच्या शोधात…
SHARES

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवं घर शोधण्यास सुरूवात केल्याचं म्हटलं जात आहे. सध्या फडणवीस यांचा मुक्काम वर्षा बंगल्यावर असून हा बंगला त्यांना लवकरच सोडावा लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान अशी मुंबईतल्या मलबार हिल येथील वर्षा बंगल्याची ओळख आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारी व्यक्ती या बंगल्यात राहण्यास येते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस या बंगल्यात रहात आहेत. आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही त्यांनी हा बंगला सोडलेला नाही. कारण ‘मी पुन्हा येणार..’ असं म्हणणाऱ्या फडणवीसांना आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास वाटत होता. 

हेही वाचा- फडणवीस सरकारने ५ लाख कोटींचं कर्ज लादलं, वाचा सद्यस्थिती

त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्यांनी या बंगल्यात राहण्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढही मागून घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हाताशी धरून रातोरात सरकारही स्थापन केलं आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण यंदाचं मुख्यमंत्रीपद त्यांच्यासाठी औटघटकेचं ठरलं. अवघ्या ८० तासांत त्यांचं सरकार कोसळल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

आता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असून नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानी रहायला जाणार आहेत. त्याआधी फडणवीस यांना हा बंगला सोडावा लागणार आहे. त्यासाठी फडणवीस यांनी नव्या घराची शोधाशोधही सुरू केली आहे. मुव्हर्स अँड पॅकर्स यांनी वर्षा बंगल्यातील सामान घेऊन जाण्यास सुरूवात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फडणवीस यांची निवड विरोधी पक्षनेतेपदी करण्यात आल्याने त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगलाही देण्यात येईल.



हेही वाचा-

आमदार नसलेले उद्धव ७ वे मुख्यमंत्री, त्यांच्या आधी कोण?

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत बहुमत सिद्ध करण्यावर खलबतं, फडणवीसांचा आरोप



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा