Advertisement

कोरोना कोरोना करताना इतर रुग्णांकडे दुर्लक्ष नको, मुख्यमंत्र्याच्या खासगी डाॅक्टरांना सूचना

महाराष्ट्रात आतापर्यंत ६६,७९६ कोविड-१९ चाचण्या झाल्या आहेत. त्यातील ९५ टक्के चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. एवढंच नाही, तर महाराष्ट्र हे सर्वाधिक कोविड-१९ चाचण्या करणारं राज्य आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

कोरोना कोरोना करताना इतर रुग्णांकडे दुर्लक्ष नको, मुख्यमंत्र्याच्या खासगी डाॅक्टरांना सूचना
SHARES

महाराष्ट्रात आतापर्यंत ६६,७९६ कोविड-१९ चाचण्या झाल्या आहेत. त्यातील ९५ टक्के चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. एवढंच नाही, तर महाराष्ट्र हे सर्वाधिक कोविड-१९ चाचण्या करणारं राज्य आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. रविवार १९ एप्रिल रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ठाकरे यांनी ही माहिती दिली. 

महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या

कोरोनाशी मुकाबला करायचा असेल, तर जास्तीत जास्त चाचण्या करणं गरजेच आहे. त्यानुसार देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यामुळेच राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही जास्त दिसत आहे. हे खरं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ६६,८९६ कोविड-१९ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ९५ टक्के चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. ३६०० चाचण्या पाॅझिटिव्ह निघाल्या आहेत. यातील ७० ते ७५ टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मध्यम स्वरुपाची लक्षणं आढळून आली आहेत आणि ५२ कोरोनाबाधित रुग्ण हे गंभीर आहेत. तर ३०० ते ३५० जणांवर उपचार करून ते बरे झाल्यानंतर त्यांना घरीही सोडण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

जुना आजार असलेले आणि त्यांना करोनाची बाधा झालेले रुग्ण शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे आपण काहीच करु शकत नाही, बऱ्याच जणांच्या चाचणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्दी खोकला, ताप यांसारखे आजार लपवू नका. घरीच उपचार करु नका, फीव्हर क्लिनिकला भेट द्या. कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं नाही, वेळेत आलेले चिमुकले ते वृद्धही यातून बरे होत आहेत, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. 

हेही वाचा- चिंता नको! महाराष्ट्र सरकार तुम्हाला घरापर्यंत नेऊन सोडेल, उद्धव ठाकरेंचं परप्रांतीय मजुरांना आश्वासन

डाॅक्टरांनी घाबरू नये

महाराष्ट्रातील डॉक्टरांनी घाबरुन जाऊ नये. सरकार म्हणून आम्हाला जेवढं शक्य आहे, ते आम्ही करतोय. राज्यात पीपीई किटचा तुटवडा आहे. ही गोष्ट खरी आहे. पण जिथून आपल्याला पीपीई किटचा पुरवठा होईल तिथून आपण ते घेत आहोत. केंद्र शासनाकडूनही किटचा पुरवठा होत आहे.

खासगी दवाखाने, हॉस्पिटल्स आणि क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरांशी मी काल स्वतः बोललो, त्याचबरोबर आपले आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील बोलले. यावेळी या डॉक्टरांनी कोरोना व्यक्तीरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हाॅस्पिटल्स, क्लिनिक सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे. कोरोना कोरोना करताना जुने रुग्ण, इतर आजारांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा