Advertisement

माय मराठीचा अभिमान, ‘या’ खासदारांनी घेतली मराठीतून शपथ

लोकसभेतील शपथविधी सोहळ्यात भाजपा, शिवसेनेसहीत महाराष्ट्रातील काही खासदारांनी मराठीतून गोपनीयतेची शपथ घेत, मायमराठीचा गौरव केला.

माय मराठीचा अभिमान, ‘या’ खासदारांनी घेतली मराठीतून शपथ
SHARES

लोकसभेचं विशेष सत्र सोमवारपासून सुरू झालं. या विशेष सत्राच्या पहिल्या दिवशी लोकसभेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना खासदारकीची शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात भाजपा, शिवसेनेसहीत महाराष्ट्रातील काही खासदारांनी मराठीतून गोपनीयतेची शपथ घेत, मायमराठीचा गौरव केला.

गोपनीयतेची शपथ 

सोमवार १७ जूनपासून १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनाला सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवीन खासदारांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या शपथविधी कार्यक्रमात देशाच्या विविध राज्यातून निवडून आलेल्या खासदारांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. तर भाजपाच्या अनेक खासदारांनी संस्कृत आणि हिंदी भाषेतून शपथ घेतली.

मातृभाषेतून शपथ

मातृभाषेतून शपथ घेण्याचा हाच सिलसिला कायम ठेवत महाराष्ट्रातील खासदार अरविंद सावंत, रावसाहेब दानवे,  इम्तियाज जलील, प्रितम मुंडे, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, ओमप्रकाश निंबाळकर, मनोज कोटक, नवनीत कौर राणा , श्रीरंग बारणे यांच्यासह अन्य खासदारांनी मराठीतून शपथ घेतली.

हिंदी, संस्कृतमध्ये शपथ 

तर, नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, गोपाळ शेट्टी, हीना गावित, पूनम महाजन, सुधाकर शृंगारे, यानी हिंदीतून, सुजय विखे-पाटील, उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीमधून आणि उन्मेश पाटील, सुनील मेंढे यांनी संस्कृतमधून शपथ घेतली.

 सोशल मीडियातून नाराजी

महाराष्ट्रातून लोकसभेत निवडून गेलेल्या सर्व ४८ नवनिर्वाचित खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी अशी मागणी होत होती. सोशल मीडियावर #मराठीतशपथ अशा हॅशटॅग देखील ट्रेण्ड झाला होता. त्यानुसार ज्या खासदारांनी मराठीतून शपथ घेतली त्यांचं कौतुक आणि ज्या खासदारांनी हिंदी, संस्कृत आणि इंग्रजीमधून शपथ घेतली त्यांच्याविरोधात सोशल मीडियातून   नाराजी व्यक्त करण्यात आली.हेही वाचा-

भ्रष्टाचार दडपण्यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार- अशोक चव्हाण

राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी, जाहीरनामा समितीची घोषणासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा