Advertisement

पोस्टरमधून राम कदमांची मनसेकडून खिल्ली; घाटकोपरमध्ये लावले पोस्टर

पप्पू कान्ट डान्स साला, गोविंदा आला रे आला, पप्पू पुन्हा नापास झाला अशा शब्दात राम कदम यांची खिल्ली उडवत हे पोस्टर घाटकोपरमधील सर्वच चौकांमध्ये अाणि त्यांच्या घरासमोरही लावण्यात अाले अाहेत. राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाही यामध्ये उल्लेख केला अाहे

पोस्टरमधून राम कदमांची मनसेकडून खिल्ली; घाटकोपरमध्ये लावले पोस्टर
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे ) मधून भाजपात गेलेले अामदार राम कदम यांची घाटकोपरमध्ये बॅनरच्या माध्यमातून मनसेने चांगलीच खिल्ली उडवली अाहे. प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील अामदारांच्या कामगिरीचा अहवाल सादर केला अाहे. या अहवालात राम कदम यांचं स्थान शेवटचं म्हणजे ३२ वं अाहे. हा अहवाल म्हणजे मनसे कार्यकर्त्यांसाठी एक चालून अालेली संधीच होती. मग ते याचा फायदा न उठवतील तर विशेषच.


पप्पू पुन्हा नापास

पप्पू कान्ट डान्स साला, गोविंदा आला रे आला, पप्पू पुन्हा नापास झाला अशा शब्दात राम कदम यांची खिल्ली उडवत हे पोस्टर घाटकोपरमधील सर्वच चौकांमध्ये अाणि त्यांच्या घरासमोरही लावण्यात अाले अाहेत. राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाही यामध्ये उल्लेख केला अाहे. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात खालून पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल कदम यांचे अभिनंदन करत मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी प्रामाणिक सर्वेक्षण केल्याबद्दल प्रजा फाऊंडेशनचे आभार मानले आहेत. घाटकोपरमध्ये विकास कामं होत नसल्याचं या अहवालातून समोर अालं अाहे. याकडे राम कदम यांचं लक्ष वेधण्यासाठी हे बॅनर लावण्यात अाल्याचं चुक्कल यांनी सांगितलं.

अमीन पटेल नंबर वन

प्रजा फाऊंडेशनने दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सर्व अामदारांच्या कामगिरीचा अहवाल प्रसिद्ध केला अाहे. या अहवालात २०१६ ते २०१७ या कालावधीतील चार अधिवेशनांमधील अामदारांच्या कामगिरीची नोंद घेण्यात अलाी अाहे. अहवालानुसार, काँग्रेसचे अामदार अमीन पटेल यांची कामगिरी सर्वात चांगली असून ते पहिल्या स्थानावर अाहेत. तर घाटकोपरचे भाजपाचे अामदार राम कदम कामगिरीबाबत शेवटच्या म्हणजे ३२ व्या स्थानावर अाहेत.



हेही वाचा - 

कामत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबईत बनणार अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा