Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

महाराष्ट्रात सध्या ‘लोकशाही’ नसून ‘लॉकशाही’ सुरु- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात सध्या लोकशाही नसून लाॅकशाही सुरू असल्याचंच चित्र दिसून येत असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्रात सध्या ‘लोकशाही’ नसून ‘लॉकशाही’ सुरु- देवेंद्र फडणवीस
SHARES

आवश्यकता असेल तेव्हा लाॅकडाऊन करणं चुकीचं नाही. परंतु लाॅकडाऊन केल्यानंतर गोरगरीबांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसतो. या काळात त्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. परंतु एवढी देखील जाणीव राज्य सरकारला उरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या लोकशाही नसून लाॅकशाही सुरू असल्याचंच चित्र दिसून येत असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा येथील प्रचारासभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम आणि भोंगळ कारभारामुळे कोरोनाच्या या संकटात महाराष्ट्राची (maharashtra) अशी दयनीय अवस्था झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, आतातर गेले १० दिवस देशामध्ये जे मृत्यू होत आहेत, त्यामध्ये ५० ते ५५ टक्के महाराष्ट्रातील आहेत, अशी अवस्था महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राची करून ठेवली आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊनवर एकमत? लवकरच घोषणेची शक्यता

आज राज्यात सरकार आहे की नाही, अशी स्थिती आहे. सारे मंत्री आत्ममग्न, अख्ख सरकार आत्ममग्न! कोरोनात (coronavirus) सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात. ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही, बेड नाही, अशी अवस्था केली आहे.

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं होत नाही. त्यामुळे १५ वर्ष जे सत्तेत होते, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. वीज बिलांना स्थगिती दिली, तेव्हा वाटलं राजा उदार झाला. पण, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री म्हणाले आता वसुली सुरू. १७ तारखेला मतदान झालं की, हे सरकार पुन्हा १८ तारखेपासून तुमची वीज कापणार. कोरोनामुळे गरीब जनता सर्वाधिक प्रभावित झालेली असताना या सरकारने मुंबईच्या (mumbai) बिल्डरांना ५००० कोटींची सूट दिली. मात्र गरीब, शेतकरी यांना मात्र मदत करायला पैसा नाही, हे हे सरकार सांगतं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सरकार बांधावर जाऊन सांगायचे, ५० हजार देऊ, दीड लाख देऊ. पण अजून २ हजार रूपये देखील कुणाला मिळालेले नाहीत. हे म्हणाले कर्जमुक्ती देऊ. पण, आज जनतेला या सरकारपासून मुक्ती मागण्याची वेळ आली आहे. आज पोलिसांना हप्तेवसुलीचे टार्गेट दिले जात आहेत. पूर्वी हे सरकार होतं, महाविकास आघाडी! नंतर झालें, महाविनाश आघाडी! आणि आता झालं, महावसुली आघाडी!!!, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.

(maharashtra opposition leader devendra fadnavis slams maha vikas aghadi government in pandharpur rally)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा