मराठा आरक्षणावर राज्य सरकारचा वेळकाढूपणा सुरू आहे. त्यामुळेच राज्यभरातील मराठा समाजामध्ये संतापाची भावना आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यसमिती बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. (maharashtra opposition leader devendra fadnavis slams maha vikas aghadi government over maratha reservation in bjp meeting)
यावेळे देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यापासून राज्यभरातील मराठा समाजामध्ये संतापाची भावना आहे. पण राज्य सरकारकडून नुसता वेळकाढूपणा करत आहे. तर आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी पुन्हा भाजपवर आरोप करत आहे. कुणी काही आरोप केला की महाराष्ट्रद्वेष म्हणायचं आणि भाजपवर टीका करून मोकळं व्हायचं हे या सरकारचं एकच काम आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे हे सरकारचं काम असतं, पण हे सत्ताधारी पूर्णपणे विसरले आहेत.
हेही वाचा- मंदिर नाही, पण मदिरा सुरू, ही कोणती भूमिका?- देवेंद्र फडणवीस
हाथरसच्या घटनेवरून तेथील सरकारला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात आहे. हाथरसचा निषेध प्रत्येकाने केलाच पाहिजे. पण महाराष्ट्रातील किती भगिनींबद्दल सरकारने संवेदना दाखविली? याचा विचारही केला पाहिजे. कोविड सेंटरमध्ये बलात्कार आणि विनयभंग या नित्याच्याच घटना झाल्या आहेत. किती बलात्कार आणि विनयभंग झाल्यावर तुम्ही नियम (SOP) तयार करणार ते तरी सांगा, असा प्रश्न देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला.
हेही वाचा- रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल- देवेंद्र फडणवीस