Advertisement

राष्ट्रवादीचा गटनेता कोण? संभ्रम अजूनही कायम

भाजपकडून अजूनही अजित पवारच राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेते असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे राष्ट्रवादीचा अधिकृत गटनेता कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचा गटनेता कोण? संभ्रम अजूनही कायम
SHARES

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर पक्षाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची या पदी नेमणूक केली, असली भाजपकडून अजूनही अजित पवारच राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेते असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे राष्ट्रवादीचा अधिकृत गटनेता कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

हेही वाचा- अजित पवारांशी कोणताही संबंध नाही- धनंजय मुंडे

अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचं सह्या असलेलं पत्र जेव्हा राज्यपालांना सादर केलं तेव्हा ते राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेते होते. परंतु हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादीने बैठक बोलवून अजित पवार यांची या पदावरून उचलबांगडी केली आणि ठराव करत त्यांच्या जागी जयंत पाटील यांची विधीमंडळ गटनेते म्हणून नेमणूक केली. विधीमंडळाच्या रेकाॅर्डवरही पाटील यांच्या नावाची नोंद झाल्याची माहिती विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.  

हेही वाचा- बुधवारीच बहुमत चाचणी घ्या, गुप्त मतदानही नको- सर्वोच्च न्यायालय

तर, दुसऱ्या बाजूला अजित पवार अजूनही राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते आहेत. कारण त्यांच्या गटनेता पदाच्या नियुक्तीचं पत्र राजभवनात आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून राज्यपालांसोबत दोनदा चर्चाही केलेली आहे. त्यानुसार राज्यपालांनी आपला निर्णय घेतला होता. जयंत पाटील यांनी सादर केलेलं पत्र केवळ प्रतिदावा असल्याने अजित पवार यांचा व्हिप सर्व आमदारांना बंधनकारक असेल, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितल्यानंतर राष्ट्रवादीचा अधिकृत गटनेता कोण याबाबत संभ्रम वाढला आहे. 

या दोघांपैकी अधिकृत गटनेता कोण हे ठरवण्याचे कायदेशीर अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतात. त्यानुसार कायदेशीर प्रक्रियेनुसार बागडेच पाटील यांच्या प्रतिदाव्याची शहानिशा करून निर्णय घेतील, असंही म्हटलं जात आहे. 



हेही वाचा-

महाविकास आघाडीच्या ओळख परेडमध्ये फक्त १३० आमदार- नारायण राणे

अजित पवारांची बंडखोरी सुप्रिया सुळेंच्या पथ्थ्यावर?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा