Advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! सातव्या वेतन आयोगाची थकबाकी होणार गणपतीत जमा


सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! सातव्या वेतन आयोगाची थकबाकी होणार गणपतीत जमा
SHARES

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने गणेशोत्सवाचा मुहूर्त शोधला आहे. त्यानुसार गणेशोत्सवादरम्यान कर्मचाऱ्यांच्या खात्यात सातव्या वेतन आयोगाची थकबाकी जमा होण्यास सुरूवात होणार आहे.


कधीपासूनची थकबाकी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकबाकीची रक्कम कधी जमा होणार? हा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत होता. हा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.


किती मिळणार थकबाकी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचं सरकारनं ठरवलं आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१६ पासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात होणार आहे. प्रथमश्रेणीतील कर्मचाऱ्यांना १ लाख रूपये, द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ७५ हजार रुपये, तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २५ हजार रूपये इतकी थकबाकी मिळणार आहे.


२१ हजार कोटींचा भार

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारवर दबाव आणला होता. त्यानुसार सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. सातवा वेतन आयोग लागू केल्यास सरकारी तिजोरीवर २१ हजार कोटींचा भार पडणार आहे.हेही वाचा-

सरकारी कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन

बक्षी समितीच्या अहवालानंतरच 'सातवा वेतन आयोग'Read this story in हिंदी
संबंधित विषय