Advertisement

राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' जाणार 'एनडीए'त


राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' जाणार 'एनडीए'त
SHARES

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)त सहभागी होणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडून 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यावर त्यांचा पक्ष 'एनडीए'त दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार राणेंनी एका पत्रकार परिषदेत यासंदर्भातील औपचारीक घोषणा केली.


मंत्रीपदाचा अंतिम निर्णय भाजपाचा

या घोषणेदरम्यान राणे यांनी आ. नितेश राणे यांच्यासह अनेक आमदार आपल्या पक्षात येतील, असा दावा केला. तर आपल्या मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा अंतिम निर्णय घेईल, असे सांगितले.


राणे-मुख्यमंत्री भेट

त्याआधी नारायण राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी 'एनडीए'त येण्याबाबत आपल्याकडे विचारणा केल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली. माझा निर्णय दोन दिवसांत त्यांना कळवणार असल्याचे मी म्हटले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी रालोआमध्ये सहभागी होण्याची घोषणा करत आहे, असे राणे म्हणाले.हेही वाचा -

मुंबईतील राणे समर्थक नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यातडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement