Advertisement

शिवडी-वरळी कनेक्टरच्या कामाला मिळणार गती

शिवडी-वरळी कनेक्टर या दोन किनारपट्ट्यांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम जलदगतीने होण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली.

शिवडी-वरळी कनेक्टरच्या कामाला मिळणार गती
SHARES

शिवडी-वरळी कनेक्टर या दोन किनारपट्ट्यांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम जलदगतीने होण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत या रस्त्यांतर्गत येणाऱ्या प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनावर देखील चर्चा करण्यात आली.

सह्याद्री अतिथीगृह इथं शुक्रवारी झालेल्या या बैठकीस आमदार अजय चौधरी, आमदार सदा सरवणकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, समाधान सरवणकर, उर्मिला पांचाळ, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, मुख्य अभियंता (रस्ते) दराडे आदी उपस्थित होते.

शिवडी-वरळी कनेक्टर हा मुंबईच्या दोन किनारपट्ट्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता प्रकल्प आहे. या प्रकल्पाचं काम सुरळीत तसंच गतीने व्हावं यासाठी या प्रकल्प मार्गावरील लोकप्रतिनिधी आणि एमएमआरडीए (mmrda), महापालिका अधिकारी यांच्यामध्ये वेळोवेळी बैठक घेऊन प्रकल्पाचं काम गतिमान करण्यात येत आहे. 

हेही वाचा- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड

या आढावा बैठकीत विशेषत: प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांचं त्याच परिसरात चांगल्या रितीने कसे पुनर्वसन करता येईल, याबाबत यावेळी चर्चा झाली. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल, असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार ४ झाडे हटविण्यासंदर्भातील प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या (bmc) वृक्ष प्राधिकरण समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं कामात अडथळा ठरणारी झाडे हटविण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी प्रकल्पाचं काम लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा प्रकल्प २२ किमी लांबीचा आहे. ठाणे खाडीवर त्यासाठी पूल बांधण्यात येणार आहे. पुलामुळं शिवडी, नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी, रायगड, पुणेपर्यंतचा प्रवास कमीत कमी वेळेत होणार पुलाच्या बांधकामात बाधा आणणारे तब्बल १००४ झाडे हटविण्यात येणार पुलाच्या जागेत बाधा आणणाऱ्या १ हजार १७२ झाडांचा समावेश. तर त्यापैकी १००४ झाडे हटविणे गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. यावरून राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

(maharashtra tourism minister aaditya thackeray takes review meeting on sewri worli connector mumbai)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा