Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

मराठी भाषा पंधरवड्याची सांगता, ३४ पुरस्कारांचीही घोषणा

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या ३४ पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.

मराठी भाषा पंधरवड्याची सांगता, ३४ पुरस्कारांचीही घोषणा
SHARES

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या ३४ पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.

मराठी भाषेतील साहित्य निर्मितीतील योगदानाबद्दल पुरस्कारप्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतानाच या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन व वृद्धी यासाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे, कला शिक्षक गोपाल वाकोडे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले उपस्थित होते.

हेही वाचा- मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन परस्परसंवादी पुस्तकांची निर्मिती व्हावी. मराठीचे संवर्धनच नव्हे तर मैत्रीपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा वृद्धींगत होणं गरजेचं आहे.

मंत्रालयातील लेखकांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची संकल्पना लोकांच्या पसंतीस उतरली आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेतून स्वाक्षरी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणारे कला शिक्षक वाकोडे गुरुजी यांचेही काम उल्लेखनीय असल्याचं सुभाष देसाई यांनी सांगितलं.

नवीन शब्दांचा समावेश करावा 

मराठी भाषा पंधरवडा यामध्ये सुधारणा करुन मराठी भाषा वृद्धीगंत पंधरवडा करण्यात यावा. समाज माध्यमावर मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला जावा. तसंच नवीन शब्दाचा मराठी भाषेमध्ये वापर करण्यात यावा, असं सन २०२० चे वैश्विक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले म्हणाले.

हेही वाचा- संपात सहभागी होऊ नका, अन्यथा शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा