Advertisement

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे २६ ते २८ मार्चदरम्‍यान होणार आहे. अध्यक्षपदासाठी ९ दावेदारांच्या नावाची चर्चा होती.

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर
SHARES

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संलग्न संस्था आणि प्रतिनिधींच्या बैठकीत डॉ. नारळीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं

९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे २६ ते २८ मार्चदरम्‍यान होणार आहे. साहित्य महामंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शनिवारी तीन तास पार पडलेल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर अखेर एकमत झाले. साहित्य मंडळ अध्यक्ष कौतिक ठाले पाटील, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या सह इतर पदाधिकारी बैठकीला हजर होते.

अध्यक्षपदासाठी होती जोरदार रस्सीखेच होती. अध्यक्षपदासाठी ९ दावेदारांच्या नावाची चर्चा होती. साहित्यिक भारत सासणे, जयंत नारळीकर, रामचंद्र देखणे, जनार्दन वाघमारे, तारा भवाळकर, अनिल अवचट, रवींद्र शोभणे, मनोहर शहाणे, गणेश देवी यांची नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.

जयंत नारळीकर यांनी विज्ञानकथा, तसेच अनेक विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखन केले आहे. महाराष्ट्र सरकारने डॉ. नारळीकरांना २०१० साली 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित केले. भारत सरकारने डॉ. जयंत नारळीकर यांना 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' या नागरी पुरस्काराने गौरवलं आहे. तसंच, स्मिथ्स प्राईज, अॅडम्स प्राईज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानेही डॉ. नारळीकरांचा गौरव झाला आहे.हेही वाचा -

मुंबईत २४ तासात तब्बल 'इतक्या' कावळ्यांचा मृत्यू

हार्बर मार्गावर लवकरच धावणार गोरेगाव-पनवेल लोकलसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा