राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्रालय राष्ट्रवादीकडे असताना ही नोटीस बजावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह ११ जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
२०१८ मध्ये या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. सदर प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.
हेही वाचा