Advertisement

‘याला’ म्हणतात धर्मनिरपेक्षता… ओवेसींनी मुख्यमंत्र्यांना दिलं ग्यान!

निवडणुकीच्या मैदानातील कट्टर शत्रू काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेवर हिंदूत्ववाद सोडल्याची टीका होत आहे.

‘याला’ म्हणतात धर्मनिरपेक्षता… ओवेसींनी मुख्यमंत्र्यांना दिलं ग्यान!
SHARES

निवडणुकीच्या मैदानातील कट्टर शत्रू काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेवर हिंदूत्ववाद सोडल्याची टीका होत आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातत्याने धर्मनिरपेक्षेवरून प्रश्न विचारले जात आहेत. हे प्रश्न टाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या समजावून सांगितली आहे. 

हेही वाचा- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाकडून समन्स

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर ते तत्काळ मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीसाठी रवाना झाले. या बैठकीनंतर त्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका वार्ताहाराने त्यांना किमान समान कार्यक्रमान धर्मनिरपेक्षता शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे, तेव्हा शिवसेनेने हिंदुत्ववाद सोडून धर्मनिरपेक्षता स्वीकारली का? असा प्रश्न केला.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी तुमच्या मते धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? असा त्यांना प्रतिप्रश्न करत उत्तर देण्याचं टाळलं. त्यावर निशाणा साधताना ओवेसींनी मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्षतेची व्याख्या समजावून सांगितली आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हा काही तात्विक प्रश्न नाही, ज्यासाठी सखोल चिंतनाची आवश्यकता असते. तुम्हाला तुमच्या स्वत:च्या किमान समान कार्यक्रमामधील शब्दांचे अर्थ इतरांना विचारावे लागत आहे, हे फार वाईट आहे. असाे. थोडे ज्ञान घ्या धर्मनिरपेक्षता म्हणजे १) हिंदुराष्ट्र नसणे, २) श्रद्धेत भेदभाव न करणे. काही समजलं का? असं म्हणत ओवेसींनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 



हेही वाचा-

आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

शपथविधीच्या आयोजनावर राज्यपाल कोश्यारी नाराज, नेमकं काय खटकलं?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा