Advertisement

आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण

दोन दिवसांपूर्वी आमदार गीता जैन यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली.

आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण
SHARES

मिरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरातच अलगीकरण करण्यात आलं आहे. याशिवाय अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे बोराडे यांना पी. बी. जोशी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.

दोन दिवसांपूर्वी आमदार गीता जैन यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  गीता जैन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना देखील घरीच अलगीकरण होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अग्निशमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांचा अहवाल २८ जूनला पॉझिटिव्ह आला.  त्यांना सेक्टर ७ जवळील पी. बी. जोशी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.  मिरा-भाईंदर शहरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. येथील रुग्णांचा आकडा आता ३,३२६ वर गेला आहे. तर  १५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा