पहिले आमचे छत्रपती म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर कुरघोडी


SHARE

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणाला रायगडचं रूप देऊ, या घोषणेची आठवण काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी करून दिली आहे. इतकंच नव्हे तर जे शब्द देऊनही महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारू शकले नाहीत ते राम मंदिर काय उभारणार, असं म्हणत महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारत उद्धव ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी कुरघोडी केली आहे.


छत्र उभारत सेनेला शह

मार्चमध्ये महाराजांच्या तिथीनुसारच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे यांनी महाराजांच्या पुतळ्याचं पुजन केल होतं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराजांना एकटं उन्हातान्हात उभं केल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं होतं. तुम्हाला जमत नसेल तर सांगा आम्ही पुतळ्याच्या परिसरात रायगड उभा करू असं जाहीरपणे म्हटलं होतं. त्यांच्या या घोषणेला आठ महिने उलटले तरी महाराजांच्या पुतळ्यावर साधं छत्रही उभारू शकलेलं नाहीत, असं म्हणत नितेश राणे यांनी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारलं आहे. शुक्रवारी नितेश राणे यांनी ढोल ताशांच्या गजरात छत्र उभे करत शिवसेनेला चांगलाच शह दिला आहे. 


फेसबुकवरून टीका

पहिले आमचे छत्रपती, मग जाऊन करा अयोध्यामध्ये आरती अशी पोस्ट फेसबुकवर टाकत नितेश राणे यांनी महाराजांच्या पुतळ्यावर कशाप्रकारे छत्र उभारले याची माहिती दिली आहे. जे शिवसेनेला जमलं नाही ते नितेश राणे यांनी करून दाखवलं, असंही या पोस्टमध्ये नमूद कऱण्यात आलं आहे. हेही वाचा - 

राम मंदिरासाठी विधेयक आणा- संजय राऊत

Exclusive: १ डिसेंबरला जल्लोष की आक्रोश?
संबंधित विषय
ताज्या बातम्या