Advertisement

मोनोच्या विटेवरी..विठ्ठल उभा राहील का?


मोनोच्या विटेवरी..विठ्ठल उभा राहील का?
SHARES

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिराच्या धर्तीवर दादर मोनो स्थानकाला विठ्ठल मंदिर नाव देण्याची मागणी होत आहे. मात्र विठ्ठल भक्तांची ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता नाही. कारण, एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल मंदिर हे नाव मोनो स्थानकाला देण्याची मागणी एमएमआरडीएने फेटाळली आहे. तर मुंबई लाइव्हने याविषयी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांना विचारलं असता त्यांनी यास दुजोरा देत नाव बदलता येणार नाही असे लेखी कळवण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

दादर मोनो स्थानक नावाचे बोर्ड लागले असून सर्व कागदपत्रं याच नावाने तयार झाली आहे. तर तिकिट प्रणाली सिग्नल प्रणालीतही दादर स्थानक याच नावाने काम करण्यात आले आहे. काम इतके पुढे गेलेले असताना आणि एवढा खर्च झालेला असताना पुन्हा नाव बदलणं शक्य नसल्याचं एमएमआरडीएचं म्हणणं आहे. त्यामुळे दादर मोनो स्थानकाचे नाव विठ्ठल मंदिर होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. तर कंत्राटदार मात्र अतिरिक्त खर्च मिळाला तर नाव बदलता येईल असं सांगत आहेत.

विठ्ठल भक्त आणि विठ्ठल मंदिर समितीने मात्र याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. विठ्ठल मंदिर नाव जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत मोनोचे उद्घाटन होऊ दिले जाणार नाही असा इशारा विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य दीपक शिंदे यांनी दिला आहे. तर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचं म्हणत आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

दादर मोनो स्थानकावर मुंबई लाईव्हनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट:

https://www.mumbailive.com/mr/city/dadar-monorail-halt-to-be-called-vitthal-mandir-station-6271

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा