Advertisement

मनसे कार्यकर्त्यांची निरुपम यांच्या घरासमोर निदर्शने


मनसे कार्यकर्त्यांची निरुपम यांच्या घरासमोर निदर्शने
SHARES

मुंबईतील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी निरुपम यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.


कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

'संजय निरुपम हाय हाय' अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हातगाडी ढकलत अनधिकृत फेरीवाल्यांचा निषेध केला. दरम्यान पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.वाशीतही मनसे कार्यकर्ते आक्रमक

रविवारी संध्याकाळी वाशी येथे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांच्या स्टाॅलची तोडफोड केली. या फेरीवाल्यांना हटवल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीकांत माने, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, स्वप्नील गाडगे आणि सागर नाईक या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भाजपाची गांधीगिरी

दरम्यान, मुलुंडमधील भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी रविवारी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, रेल्वेचे पोलीस यांची बैठक घेत त्यांच्यासोबत रेल्वे स्थानक परिसरात फिरून सर्व फेरीवाऱ्यांना हात जोडत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असल्यामुळे तुमच्याकडून सहकार्य लाभले तर कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. वाहतूककोंडी निर्माण होऊन मुलुंडच्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार या भागातील जवळपास सर्वच फेरीवाऱ्यांनी स्वत:हून आपले धंदे हटवले, असे प्रकाश गंगाधरे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले. हेही वाचा -

कारवाईनंतरही फेरीवाले दिसल्यास मनसे स्टाईल दाखवू - नितीन सरदेसाई

काँग्रेस काढणार फेरीवाल्यांसाठी मोर्चासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा