गुजराती लोकांची दादागिरी चालू देणार नाही - संदीप देशपांडे

गुजराती लोकांची दादागिरी चालू देणार नाही - संदीप देशपांडे
गुजराती लोकांची दादागिरी चालू देणार नाही - संदीप देशपांडे
See all
मुंबई  -  

नेहमी मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर आक्रमक होणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शुक्रवारी पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरले. यावेळी मनसेने प्रभादेवीच्या पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स आणि माहिमच्या शोभा हॉटेलच्या मालकांना धाक दाखवत गुजराती पाट्या लावल्याने चांगलाच राडा केला. या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांवर गुजराती भाषेत पाट्या लावल्याच कशा? याचा जाब विचारत मनसे कार्यकर्त्यांनी त्या पाट्या काढायला लावल्या.

काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासह मंबईतील सर्व हॉटेल आणि दुकानांवर मराठीत नाव असलेल्या पाट्या लावाव्यात असे आदेश व्यापाऱ्यांना दिले होते. पण प्रभादेवी आणि माहीममधील काही हॉटेल आणि दुकान मालकांनी मराठीसोबतच गुजराती भाषेतील पाट्या देखील दुकानावर लावल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरत पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे आणला.

'मनसे कार्यकर्ते आले. त्यांनी आम्हाला गुजराती भाषेतील पाटी काढायला सांगितली. ती आम्ही काढली आहे. त्यामुळे कोणताच वाद झाला नाही,' असे पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या मॅनेजरने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले. यासंदर्भात 'मुंबई लाइव्ह'ने शोभा हॉटेलच्या मालकाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.


गुजराती पाट्या लावण्याचा संबध काय? इथे काय गुजरातचे पाणी आणि गुजरातची जमीन वापरतात का? हे लोक गुजरातमध्ये लावतात का मराठी पाट्या? ही गुजराती लोकांची दादागिरी सुरू आहे. ती आम्ही चालू देणार नाही.

संदिप देशपांडे, प्रवक्ते, मनसे


हेही वाचा -

मनसेचे मराठी पाट्यांसाठी कल्याणमध्ये आंदोलन


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.