Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

राज ठाकरे लिलावती रुग्णालयात एॅडमिट! नेमकं काय झालं?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राज ठाकरे लिलावती रुग्णालयात एॅडमिट! नेमकं काय झालं?
SHARES

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray admitted ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाठीच्या दुखण्याचा त्रास होत असल्यामुळे लिलावतीमध्ये (Lilavati hospital ) दाखल करण्यात आलं आहे.

लवकरच त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. पाठीचं दुखणं बळावल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे गैरहजर होते. 

मिळालेल्या माहितीप्रमाणे, राज यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होत आहे. मात्र ही शस्त्रक्रिया फार मोठी नसून छोट्या स्वरूपाची आहे. त्यामुळे त्यांना रविवारी सकाळी घरी सोडण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.  

जानेवारी महिन्यात  टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या डाव्या हाताला ही दुखापत झाली होती. ही दुखापत फार मोठी नसली तर हातावर सूज आल्यानं त्यांनी तातडीनं हिंदुजा रुग्णालयात उपचार घेतले होते.

राज ठाकरे रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समजल्यावर मनसेचे MNS कार्यकर्ते चिंताग्रस्त आहेत.हेही वाचा

असे खूप आंडू पांडू येऊन गेलेत, भिडेंच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप

अनिल परबांची बाजू तर पक्षप्रमुखही घेत नाहीत- भाजप

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा