Advertisement

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे 'हे' कारण, राज ठाकरेंनी दिलं खणखणीत उत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (chatrapati shivaji maharaj jayanti) सणाप्रमाणे साजरी झाली पाहिजे. एवढंच नाही, तर महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी व्यक्त केलं.

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे 'हे' कारण, राज ठाकरेंनी दिलं खणखणीत उत्तर
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (chatrapati shivaji maharaj jayanti) सणाप्रमाणे साजरी झाली पाहिजे. एवढंच नाही, तर महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS, raj thackeray) यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये तिथीनुसार शिवजयंती (shiv jayanti) साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा- मनसेच्या शिवजयंती कार्यक्रमाला प्रशासनाचा नकार, राज ठाकरे नाराज

देशभरातील सण तिथीनुसारच

शिवजयंती (shiv jayanti) तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार? या वादावर खुलासा करताना राज ठाकरे म्हणाले, मी काही वर्षांपूर्वी ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर (jayant salgaonkar) यांची भेट घेतली होती. तेव्हा शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार? असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी सांगितलं की भारतात आपण वर्षभर जे सण साजरे करतो ते तिथीनुसार असतात. दिवाळी (diwali festival), गणपती (ganpati festival) हे सण आपण तारखेनुसार सण साजरे करत नाही, तर तिथीनुसारच करतो. महाराजांची जयंती देखील आपल्यासाठी एक सणच आहे. त्यामुळे आपण ती तारखेनुसार साजरी केली पाहिजे. एवढंच नाही, तर शिवजयंती आपण ३६५ दिवस साजरी केली पाहिजे.  

देशात आधीच रोगराई

प्रशासनाने कोरोना व्हायरसच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर मनसेच्या शिवजयंती (shiv jayanti) कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. त्यावर बोलताना आपल्याकडे दिवसाला ४०० जण टीबीमुळे (TB) दगावतात, तर वर्षाला साधारणत: दीड लाख लोकं दगावतात. भारतात इतक्या वेगवेगळ्या प्रकारची रोगराई पसरलेली असताना, उगाचच कोरोनाच्या नावाने भीती निर्माण केली जात आहे. हा आजार पसरु नये म्हणून नक्कीच काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन कामही करत आहे. परंतु अजून देशात चिंताजनक म्हणावी अशी परिस्थिती उद्धवलेली नाही.

हेही वाचा- चव्हाणांचे ते मत ऐकले असते तर, बाबरी पडलीच नसती - शरद पवार

कोरोनासाठी (coronavirus) दक्षता घेऊन कलम १४४ लावलं जात आहे. संभाजीनगरमध्ये कार्यक्रम रद्द केले जात आहेत. मला सरकारला हेच विचारायचं आहे की मग तुम्ही महापालिकेच्या निवडणुका पुढं ढकलणार आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा