Advertisement

व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार

१ लाख २० हजार विहिरी, हागणदारीमुक्त महाराष्ट्र, इतर थापा असं लिहिलेल्या कागदपत्रांवर फडणवीस पाय ठेवून झोपल्याचं या चित्रात दिसत आहे. विशेष म्हणजे, फडणवीस एका नावेत झोपले असून ती नाव कोरड्या जमिनीवर आहे. या नावेला महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्थिती असं नाव देण्यात आलं आहे.

व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार
SHARES

पुढचा मुख्यमंत्री मीच होणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका कार्यक्रमात केलं अाहे. या वक्तव्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आपल्या   व्यंगचित्रांच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला आहे. राज यांनी व्यंगचित्र काढून फडणवीस यांना चांगलंच फटकारलं अाहे.


बुडालेली नाव

राज यांनी अापल्या या व्यंगचित्रात महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती दाखवली आहे. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ असल्याचं व्यंगचित्रात म्हटलं अाहे. १ लाख २० हजार विहिरी, हागणदारीमुक्त महाराष्ट्र, इतर थापा असं लिहिलेल्या कागदपत्रांवर फडणवीस पाय ठेवून झोपल्याचं या चित्रात दिसत आहे. विशेष म्हणजे, फडणवीस एका नावेत झोपले असून ती नाव कोरड्या जमिनीवर आहे. या नावेला महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्थिती असं नाव देण्यात आलं  आहे. राज्याची आर्थिक स्थितीही ही या बुडालेल्या नावेप्रमाणेच असल्याचं राज यांना सुचवायचं आहे.


जनतेची भावना

नावेला टेकून अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार उभे आहेत. एक कोपऱ्यात राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर भाष्य करताना, २०१ तालुक्यात दुष्काळ असल्याची बातमी दिसत आहे. पुढचा मुख्यमंत्री मीच होणार या देवेंद्र फडणीवस यांच्या विधानाची राज यांनी खिल्ली उडविली आहे. परंतु देवेंद्रजी पुन्हा लाट येईल असे वाटत नाही, ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून दाखवली आहे.हेही वाचा -

उदयनराजेंना स्वाभिमान आणि आरपीआयकडून आवताण! 

मुंबई पत्रकार संघाबाहेर राष्ट्रवादी, सनातनचे कार्यकर्ते भिडले
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा