Advertisement

मुंबई पत्रकार संघाबाहेर राष्ट्रवादी, सनातनचे कार्यकर्ते भिडले

राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार संघाबाहेर सनातन आणि पुनाळेकर यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं करत सत्कार कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादी आणि सनातनचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले

मुंबई पत्रकार संघाबाहेर राष्ट्रवादी, सनातनचे कार्यकर्ते भिडले
SHARES

सनातनचे प्रवक्ते आणि वकील संजीव पुनाळेकर यांचा सोमवारी मुंबईतील पत्रकार संघात जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार संघाबाहेर सनातन आणि पुनाळेकर यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं करत हा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादी आणि सनातनचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले, प्रचंड गोंधळ झाला आणि शेवटी पोलिसांना धाव घेत परिस्थिती हाताळावी लागली.


जोरदार घोषणाबाजी

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पुनाळेकर यांचा जाहीर सत्कार होणार होता. डाॅ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंबंधी ज्यांना अटक झाली आहे, त्यांचा संबंध सनातनशी असल्याचं समोर आलं आहे. तेव्हा अशा सनातनच्या प्रवक्ते आणि वकिलांचा जाहीर सत्कार कसा काय करता? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसनं या सत्काराला विरोध केला. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दुपारी चारच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, काळे झेंडे दाखवत आपला निषेध नोंदवला.




डोकं ठिकाणावर आहे का?

खुनी लोकांचा सत्कार करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. असं असताना दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा खुनाशी संबंधित लोकांचा सत्कार कसा काय होऊ शकतो. शिवसेनेच्या खासदारांच्या हस्ते जाहीर सत्कार कसा काय होतो? सत्कार करणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतरही सत्काराचा कार्यक्रम पार पडल्याचं समजतं आहे.



हेही वाचा-

नालासोपाऱ्यात 8 देशी बॉम्ब जप्त, मुंबई एटीएसची कारवाई

गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींचा 'या' स्फोटक प्रकरणात सहभाग



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा