Advertisement

कमतरता प्रश्नांची नसून निर्णय घेण्याची आहे - राज ठाकरे

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी 'कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही', अशा शब्दांत टीका केली.

कमतरता प्रश्नांची नसून निर्णय घेण्याची आहे - राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) गुरूवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (maharashtra governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी 'कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही' अशा शब्दांत टीका केली.

राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णय घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली.

राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. राज ठाकरे पहिल्यांदाच राज्यपालांना भेटणार असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.



हेही वाचा -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा राज्यपालांच्या भेटीला

NCB ची धडक कारवाई, ड्रग्ज तस्करीतला मोठा मासा गळाला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा