Advertisement

शिवाजी मंडईतील मासे विक्रेत्यांचं स्थलांतर नाही, महापालिका आयुक्तांचं राज ठाकरेंना आश्वासन

शिवाजी महाराज मंडईतील मासे विक्रेत्यांचं स्थलांतर सद्यस्थितीत कुठेही करण्यात येणार नाही, असं आश्वासन नुकतंच मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं.

शिवाजी मंडईतील मासे विक्रेत्यांचं स्थलांतर नाही, महापालिका आयुक्तांचं राज ठाकरेंना आश्वासन
SHARES

शिवाजी महाराज मंडईतील मासे विक्रेत्यांचं स्थलांतर सद्यस्थितीत कुठेही करण्यात येणार नाही. तसंच स्थलांतर करायचं झाल्यास ते मुंबईतच जवळच्या ठिकाणी करण्यात येईल, असं आश्वासन नुकतंच मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं. राज यांनी नुकतीच याप्रकरणी महापालिका आयुक्तांची मुख्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 


 काय आहे प्रकरण?

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासे विक्रेत्यांना नवी मुंबईतील ऐरोलीत स्थलांतरीत केलं जाईल, अशी नोटीस काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून देण्यात आली होती. या नोटीशीमुळं चिंताग्रस्त झालेल्या मासे विक्रेत्या महिलांनी राज यांची भेट घेतली होती. या भेटीत राज यांनी मासे विक्रेत्यांचा प्रश्न आयुक्तांपुढे मांडणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.


४० वर्षे जुनी मंडई

महात्मा फुले मंडईच्या (क्रॉफर्ड मार्केट) बाजूला पलटण रोडवर ही महापालिकेची अंदाजे ४० वर्षे जुनी शिवाजी मंडई आहे. ही मंडई ४ मजल्यांची आहे. मंडई धोकादायक अवस्थेत असल्याने आॅक्टोबर २०१३ मध्ये महापालिकेने मंडई रिकामी केली. महापालिकेने या मंडईचा पुनर्विकास करण्याचं ठरवलं असून येथील मासे विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्यावरून चांगलाच वाद उद्भवला आहे.

आंदोलनाचा निर्णय

शिवाजी मंडईच्या तळमजल्यावर सुमारे २०० मासळी विक्रेते बसतात. इथून दररोज लाखो रुपयांची मासे विक्री होती. इमारतीचा पुनर्विकास होईपर्यंत आधी बीपीटीच्या जागेवर नंतर मुलुंडमध्ये पर्यायी जागा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानंतर थेट ऐरोलीला स्थलांतरीत करण्याची नोटीस त्यांना देण्यात आली. यावरून मच्छिमार कृती समितीने १ आॅगस्टपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.हेही वाचा-

मुंबई की दुर्घटनांचं शहर?

शिवाजी मंडई ऐरोलीला हलवणार? मासे विक्रेत्यांची राज ठाकरेंकडे धावRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा