Advertisement

आता शिवसेना, मनसेत कायदेशीर लढाई


आता शिवसेना, मनसेत कायदेशीर लढाई
SHARES

मुंबई महापालिकेतील मनसेच्या ६ नगरसेवकांना फोडून त्यांना शिवसेनेत सामावून घेतल्यानंतर आता शिवसेना आणि मनसेत कायदेशीर लढाईला सुरुवात झाली आहे. मनसेने कोकण भवनातील विभागीय आयुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली असून ही याचिका विभागीय आयुक्तांनी स्वीकारल्यास त्यांना मनसेला सुनावणी द्यावी लागणार आहे.

'दि महाराष्ट्र लोकल अॅथाॅरिटीज मेंबर्स डिस्काॅलीफिकेशन अॅक्ट' १९८६ या कायद्यांतर्गत मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यावं, अशी मागणी मनसेने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.


काय आहे याचिकेत?

या याचिकेवर सुनावणी होऊन जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत संबंधित नगरसेवकांना महापालिका मुख्यालय सभागृहात प्रवेश देण्यात येऊ नये. विविध समित्यांमध्ये सदस्य म्हणून उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये. नगरसेवक निधी जनतेचा असल्यामुळे त्याचा वापर करण्यासही मनाई करावी, अशी मागणी केल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं.


ही लढाई नगरसेवकांना निलंबित करण्यासाठी नसून या निवडणुकीत ज्या ज्या मनसैनिकांनी या नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी घाम गाळला आहे, त्यांना न्याय देण्यासाठी हा लढा आहे.
- संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे


या ६ नगरसेवकांना शिवसेनेत विलीन करण्यासाठी ज्या कायदेशीर प्रक्रिया करायच्या आहेत, त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून कोकण विभागीय आयुक्तांना पाठवल्या आहेत. त्यामुळे याबाबतचा निर्णय कोकण विभागीय आयुक्त घेतील, असं सभागृह नेता यशवंत जाधव यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

पुन्हा 'अशी' वेळ येऊ नये म्हणून राज साधणार 'मनसे' संवाद

फुकाचा तमाशा कि राजकीय आशा?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा