Advertisement

पुन्हा 'अशी' वेळ येऊ नये म्हणून राज साधणार 'मनसे' संवाद

मुंबई महापालिकेतील मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे राज ठाकरे सावध झाले आहेत. राज यांनी या सगळ्यातून धडा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साध्यण्याचा निर्णय घेतला आहे.

पुन्हा 'अशी' वेळ येऊ नये म्हणून राज साधणार 'मनसे' संवाद
SHARES

मुंबई महापालिकेतील मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे राज ठाकरे सावध झाले आहेत. यापुढे अन्य महापालिकांमधील आपले नगरसेवक फुटू नये म्हणून राज आता मनसेच्या नगरसेवकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं कळतंय.


आता, तक्रारी, सूचना जाणून घेणार

पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे अनुक्रमे ३, ५ आणि १० नगरसेवक आहेत. त्या सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांच्या तक्रारी-सूचना जाणून घ्यायचं असं राज ठाकरेंनी ठरवल्याची माहिती मिळत आहे.


इंजिनाला धक्का

मनसेचे ६ नगरसेवक फोडून शिवसेनेने मनसेच्या इंजिनाला धक्का दिला. मुंबई महापालिकेत आता मनसेचा केवळ एकच नगरसेवक उरला आहे. त्यामुळे महापालिकेतील मनसेचं कार्यालयही गेलं आहे.

या घटनेने राज चांगलेच सावध झाल्याचं पहायला मिळत आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवसेनेने नीच राजकारण केल्याचा आरोप राज यांनी केला. काहीही असलं तरी राज यांनी या सगळ्यातून धडा घेत नव्या जोमाने काम करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.



हेही वाचा -

थिअऱ्यांचं राजकारण आणि जनतेलाच मुरडा!

राज ठाकरेंना होती नगरसेवक फुटण्याची भीती?

अरेरे, मनसेचं कार्यालयही गेलं!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा