Advertisement

मनसेच्या अभिजीत पानसेंनी घतेली उदय सामंत यांची भेट

राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

मनसेच्या अभिजीत पानसेंनी घतेली उदय सामंत यांची भेट
SHARES

मनसे नेते अभिजीत पानसे (MNS leader Abhijeet Panse) यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची गुप्त भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिजीत पानसे यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांची गुप्त भेट घेतली आहे. यावेळी युवासेना सचिव वरूण सरदेसाई देखील उपस्थित असल्याची माहीती मिळत आहे. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

अभिजीत पानसे हे उदय सामंत यांना भेटले आणि त्यावेळी वरूण सरदेसाई सुद्धा उपस्थित होते. या भेटी दरम्यानचा एक फोटोही समोर आला आहे. पण रुपाली पाटील राष्ट्रवादीत गेल्यानं मनसेचा आणखी एक नेता बाहेर पडण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

पण या चर्चांना खुद्द उदय सामंत यांनी पूर्णविराम दिला आहे. यासदंर्भात उदय सामंत म्हणाले, अभिजीत पानसे मनसेचे नेते आहेत. त्यांच्या वडिलांच्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. राजकीय चर्चा झालेली नाही.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

समीर वानखेडे यांनी दलितांवर अन्याय केल्याचे आरोप होत आहेत तर त्याची चौकशी करायला हवी अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र त्यावरून पक्षाचे उपनेते बाबू वागस्कर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद झाला होता.

प्रवक्ते पद नसताना रूपाली पाटील यांनी पक्षाच्या भूमिका मांडायला नको असं वागस्कर यांचं म्हणणं होतं. मात्र रुपाली पाटील यांनी त्याला जोरदार विरोध केला.

वागसकर यांच्या पत्नीलाच शहराध्यक्ष पद देऊन माध्यमांना केवळ त्यांच्याशीच बोलावं असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे रूपाली पाटील दुखावल्या होत्या. आपण सगळ्या तक्रारी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या मात्र त्यावर काहीही कारवाई झाली नाही.



हेही वाचा

अजित पवारांच्या उपस्थितीत रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल

राज्य सरकारला धक्का, इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा