Advertisement

मनसे नेते अमित ठाकरेंना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता, खबरदारी म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.

मनसे नेते अमित ठाकरेंना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात (lilavati hospital) दाखल करण्यात आलं होतं. मागली २ दिवसांपूर्वी ताप येत होता म्हणून खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमित ठाकरेंची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली होती. पंरतू, कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता, खबरदारी म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.

लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमित ठाकरे (amit thackeray) यांच्या मलेरिया आणि इतर चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या चाचण्याही निगेटिव्ह आल्या. 'हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. येत्या एक ते दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात येईल', अशी माहितीही डॉक्टरांनी दिली होती.

कोरोनाच्या काळात अमित ठाकरे यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. अंगणवाडी सेविकांचा प्रश्न त्यांनी राज्य सरकारकडे मांडल्या होत्या, त्यानंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळानेही अमित ठाकरेंची भेट घेऊन अपुऱ्या वेतनाबाबत समस्या मांडली होती, त्यानंतर अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत पत्र लिहिलं होतं, आरे येथील मेट्रो कारशेड बाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं अमित ठाकरेंनी स्वागत केलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा