Advertisement

महाआघाडीविषयी काय भूमिका? राज ठाकरेंचा निर्णय अंतिम- बाळा नांदगावकर

राज्यात सर्वत्र सावळागोंधळ सुरू असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

महाआघाडीविषयी काय भूमिका? राज ठाकरेंचा निर्णय अंतिम- बाळा नांदगावकर
SHARES

राज्यात सर्वसामान्य जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. पण अजूनही महाविकास आघाडीच्या सरकारला खातेवाटपासाठी मुहूर्त मिळालेला नाही. राज्यात सर्वत्र सावळागोंधळ सुरू असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. 

हेही वाचा- मंत्रीमंडळात ज्येष्ठ नेते हवेत, अशोक चव्हाण यांची अपेक्षा

प्रसारमाध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचं मिळून महाआघाडीचं सरकार सत्तेत आलं आहे. परंतु हे सरकार लोकांना फारसं आवडलेलं नाही. सर्वसामान्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना लोकांचं भलं करण्यासाठी म्हणून सत्तेत आल्याचं सांगणाऱ्या या सरकारने झटपट निर्णय घेणं अपेक्षित होतं. परंतु या सरकारचं तर खातेवाटपावरच घोडं अडलेलं आहे. परिणामी राज्यात कुठलेच निर्णय होऊ शकलेले नाही.

हेही वाचा- मंत्रीमंडळ विस्ताराचं सस्पेन्स संपणार? उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट

महाविकास आघाडी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस मनसेने तटस्थ भूमिका घेतली होती. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहणार की विरोधात भूमिका बजावणार असा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. त्यावर सांगताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे जी भूमिका घेतील, ती आम्हा सर्वांना मान्य असेल, असं नांदगावकर म्हणाले.      

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा