Advertisement

“तडजोडींमुळे व्यवसाय होतो, पण ब्रँड रसातळाला जातो”

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तडजोडींमुळे व्यवसाय तर होतो, पण ब्रँड रसातळाला जातो, असं म्हणत टोला हाणला आहे.

“तडजोडींमुळे व्यवसाय होतो, पण ब्रँड रसातळाला जातो”
SHARES

मुंबईसाठी मराठी माणसांनी एक होण्याची वेळ आली आहे, असं आवाहन करणारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घालणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तडजोडींमुळे व्यवसाय तर होतो, पण ब्रँड रसातळाला जातो, असं म्हणत टोला हाणला आहे. (mns leader sandeep deshpande reply to sanjay raut on his appeal to raj thackeray)

‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचं व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडं पडलं आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचं पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचं पतन व्हायला सुरुवात होईल.

हेही वाचा - 'ब्रँड' राज ठाकरेंना राऊतांची साद

सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून मराठी अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचं भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला, असं आपल्या लेखात संजय राऊत म्हणाले होते.

त्यावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे यांनी विचार, संयम, स्वाभिमान यामुळे "ब्रॅण्ड" मजबूत होत असतो. या उलट तडजोड, लाचारी यामुळे व्यवसाय, तर होतो; पण ब्रॅण्ड रसातळाला जातो, असं म्हणत संजय राऊत यांना टोला हाणला आहे.

मनसे २००८ साली परप्रांतीयांविरोधात लढा देत असताना संसदेत शिवसेनेचे खासदार गप्प बसून होते. एकाही खासदाराने त्यावेळी मनसेच्या भूमिकेला समर्थन दिलं नाही. पाकिस्तानी कलाकारांना हाकलून द्या, या मागणीसाठी मनसे आंदोलन करत असताना शिवसेना गप्प होती. मुंबई महापालिकेतील आमचे ६ नगरसेवक शिवसेनेने रातोरात चोरले. २०१७ आणि २०१४ साली आम्ही परप्रांतियांविरोधात लढत असताना राज साहेबांनी शिवसेनेला साद घातली होती, पण तेव्हाही शिवसेना गप्पच होती. हे लक्षात आणून देताना संदीप देशपांडे यांनी 'तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म?' या वाक्याची आठवण शिवसेनेला करून दिली.

हेही वाचा - महाराष्ट्रात बाळासाहेबानंतर एकच ब्रँड…

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा