मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीच एक धक्का बसला आहे. मनसेचे जुन्नर येथील एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

SHARE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. मनसेचे जुन्नर येथील एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादरमधील शिवसेना भवनमध्ये मनसे आमदार शरद सोनावणे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह हातावर शिवबंधन बांधलं.


मनसेमधून उमेदवारी

मागच्या विधानसभेला शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मनसेमधून उमेदवारी मिळवली होती. शरद सोनावणे हे एकमेव उमेदवार मनसेच्या तिकिटावर २०१४ मध्ये निवडून आले होते. पंरतू, त्यानंतर शरद यांनी मनसेच्या कार्यक्रमांना जाण्याचे टाळल्याचं समजतं. तसंच, पक्ष सोडणार असल्याची कल्पना सोनावणे यांनी राज ठाकरे यांना दिल्याचं देखील समजतं. दीड वर्षांपूर्वी मनसेच्या मुंबईतील ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता, एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.


सर्वजण स्वगृही

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद राव यांनी सर्वजण स्वगृही परतल्याचं सांगितलं. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी खूप प्रेम दिलं. त्याचप्रमाणं 'मला पक्षावर राग नसून, स्वगृही परतण्याची ओढ लागली होती. त्याशिवाय माझे शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.हेही वाचा - 

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी 'रेल सुरक्षा' मोबाइल अॅपची निर्मिती

राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवा; चेंबूरच्या वकीलाची पोलिसांत तक्रारसंबंधित विषय