Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे.

 भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीची पत्रं आली होती. यासंबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. गुरुवारी राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा पूर्वीचाच Y+ असणार आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेतील ताफ्यात पोलिसांची वाढ करण्यात आली आहे. सुरक्षा ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने राज ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत चर्चा झाली. याअगोदर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत नांदगावकर आणि गृहमंत्री वळसे पाटलांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यानंतर काल वळसे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयीची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली.



हेही वाचा

औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्यांनो, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल - संजय राऊत

mumbai"="" target="_blank">Mumbai News">14 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा, विरोधकांना मिळणार प्रत्युत्तर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा