Advertisement

वाढीव वीज बिल, इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, कल्याण-डोंबिवलीत तीव्र निदर्शने

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी वाढीव वीज बिल आणि इंधन दरवाढीविरोधात डोंबिवलीत केंद्र/ राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन केलं.

वाढीव वीज बिल, इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, कल्याण-डोंबिवलीत तीव्र निदर्शने
SHARES

लाॅकडाऊनच्या काळात ग्राहकांवर लादण्यात आलेले वाढीव वीज बिल, मागच्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. आर्थिक गणित बिघडल्याने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन केलं. 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक जवळ आल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. त्यानुसार मनसेने देखील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घेत आंदोलन पुकारलं. मनसेचे नवनियुक्त डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली हे वीज बिल आणि इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. कल्याण तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने मनसैनिक आणि महिला सहभागी झाले होते.  सरकारचा निषेध म्हणून काळे कपडे घालून मनसैनिक आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. इंधन दरवाढ कमी करा हे आता हात जोडून सांगतोय. हात उगारायची वेळ आणू नका असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. 

हेही वाचा- दानी पवारांच्या घरी येऊन गेल्यावर… राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

इंधन दरवाढ/वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचा भडक मोर्चा असं नाव या मोर्चाला देण्यात आलं होतं. केंद्र/राज्य सरकार जनतेची लूट थांबवा, गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा. इंधन दरवाढ कमी करा, वाढीव वीज बिल रद्द झालंच पाहिजे, केंद्र/राज्य सरकार हाय हाय, अशा घोषणा यावेळी मनसैनिकांनी दिल्या. 

त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना दरवाढ कमी करण्यासंदर्भात एक निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी मनसेचे प्रकाश भोईर, कौस्तूभ देसाई, इरफान शेख, अशोक मांडले, उल्हास भोईर, उर्मिला तांबे, दीपीका पेडणोकर, प्रकाश माने, मंदा पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, लाॅकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या वीज बिल दरवाढीच्या प्रश्नावर राज्यात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला होता. वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केलं होतं. आम्ही सरकारकडे दादही मागितली होती. त्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. परंतु अदानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी येऊन गेल्यावर मात्र सरकारने आपली भूमिका बदलली, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केला होता.

(mns rally in kalyan dombivali against fuel price hike and extra electricity bill)

हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपदावर केवळ काँग्रेसचाच हक्क- बाळासाहेब थोरात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा