Advertisement

निवडणूक न लढवताच करा भाजपाविरोधात प्रचार, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

मंगळवारी राज ठाकरे यांनी मुंबईत सभा घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच लोकसभा निवडणूक न लढवता भाजपविरोधात प्रचार करण्याचे आदेशही मनसैनिकांना दिले.

निवडणूक न लढवताच करा भाजपाविरोधात प्रचार, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
SHARES

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. तर अनेकांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली होती. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मनसे राष्ट्रवादी सोबत जाईल किंवा नाही याबाबतही तर्क वितर्क मांडण्यात येत होते. परंतु राष्ट्रवादीच्या यादीनंतर ती आशादेखील मावळली होती. त्यानंतर मंगळवारी राज ठाकरे यांनी मुंबईत सभा घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच लोकसभा निवडणूक न लढवता भाजपविरोधात प्रचार करण्याचे आदेशही मनसैनिकांना दिले.


मोदींविरोधात कामाला लागा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कामाला लागा, असा आदेश मनसैनिकांना दिला. तसंच मोदीमुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. यापुढे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात ही लोकसभा निवडणूक असेल. यापुढील आपल्या सर्व सभा मोदी आणि शाह यांच्या विरोधातल्याच असतील, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.


त्यांनीही लुटलं

भाजपाचे लोक तुमच्याकडे येऊन तुमच्याकडे पिशव्या रिकाम्या केल्या तर त्यादेखील कार्यकर्त्यांनी घ्याव्या. त्यांनी गेली ५ वर्षे देशाला लुटले आहे. त्यामुळं त्यांना लुटलं तरी काहीही फरक पडणार नसल्याचे राज म्हणाले.


निवडणूक भारताची की नेपाळची

सध्या देशभरात चौकीदार असं कॅम्पेन भाजपावाल्यांनी सुरू केलं आहे. त्यामुळे ही निवडणूक भारताची आहे की नेपाळची असा सवाल करत त्यांच्या कॅम्पेनची राज यांनी खिल्ली उडवली. तसंच हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबाबत भाजपा खोटी माहिती पसरवत आहे. खोट्या छायाचित्रांच्या आधारे त्यांच्याकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


फडणवीस हवा गेलेला फुगा

यापूर्वी वर्धापनदिनी केलेल्या भाषणानंतर राज ठाकरे यांची स्क्रिप्ट बारामतीहून येत असून ते बारामतीचे पोपट आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याच्या या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. आम्ही टीका केली ती आम्हाला पोपट म्हटलं जातं. परंतु देवेंद्र फडणवीस हे हवा गेलेला फुगा आहे, असं राज यावेळी म्हणाले. फुगलेल्या फुग्याला जसा कोणताही आकार दिला जातो तशी अवस्था फडणवीस यांची असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.




हेही वाचा -

आगे आगे देखो होता है क्या; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सूचक विधान

रेल्वे भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष ठेवा; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा