Advertisement

संजय निरूपम यांच्या सभेत मनसे कार्यकर्त्यांचा राडा


संजय निरूपम यांच्या सभेत मनसे कार्यकर्त्यांचा राडा
SHARES

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांची शनिवारी घाटकोपर, संजयनगर येथे सभा सुरू असताना या सभेत अचानक मनसे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी राडा केला. निरूपम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनसैनिकांनी सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी एका मनसैनिकाला ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून संजय निरूपम आणि मनसैनिक गुद्यांवर उतरले आहेत. मनसे फेरीवाल्यांच्या विरोधात मैदानात उतरली असताना निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ दंड थोपटले आहेत. महिन्याभरापूर्वी मालाड येथे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणाहल्ला केल्यानंतर निरूपम विरूद्ध मनसैनिक असा वाद आणखी चिघळला आहे. त्याचाच प्रत्यय शनिवारी घोटकोपरमधील निरूपम यांच्या सभेत आला.

निरूपम यांच्याविरोधात मनसैनिकांच्या मनात प्रचंड राग आहे आणि तो राग अशा प्रकारे व्यक्त होत आहे आणि होणारच. फेरीवाल्यांना चिथावणाऱ्या निरूपम यांच्या सभा यापुढेही अशाच प्रकारे उधळून लावल्या जातील.

संदीप देशपांडे, मनसे, सरचिटणीस

घाटकोपरमधील नाल्यालगतच्या झोपड्यांविरोधात पालिकेकडून तोडक कारवाई सुरू आहे. या कारवाईला काँग्रेसने विरोध केला असून त्यासाठीच निरूपम यांची एक सभा शनिवारी वॉर्ड क्रमांक १३१च्या वतीने जेतवन बुद्ध विहार, संजय गांधीर नगर येथे आयोजित करण्यात आली होती. निरूपम यांनी भाषणाला सुरूवात करताच ५ ते ६ मनसैनिकांनी निरूपम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करत त्यांचे भाषण होऊ दिले नाही. शेवटी पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी हस्तक्षेप करत एका मनसैनिकाला ताब्यात घेतल्याचे समजते आहे.



हेही वाचा

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या अधिकाऱ्याकडून टोईंग घोटाळा- निरुपम


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा