कन्हैय्या कुमारची मोदी सरकारवर टीका

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - कन्हैय्या कुमार खऱ्या अर्थाने चर्चेत आला तो जेएनयुमधील त्याच्या भाषणानं. या भाषणानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप होत त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र आता कन्हैय्याने थेट उडी घेतलीय राज्यातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या लढाईत. यावेळी कन्हैय्याने मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केला.

स्वच्छ भारतासाठी अभियान चालविले जाते. मात्र गरीब सफाई कर्मचा-यांना किमान पगारही दिला जात नाही ही शरमेची बाब असल्याचं म्हणत जिग्नेश मेवाणीने भाजपावर टीका केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या लढाईत कन्हैय्या कुमारने उडी घेतल्याने तरी कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहावं लागेल.

Loading Comments